लष्कराच्या विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग, विमानात होते दोन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 12:32 PM2022-01-28T12:32:09+5:302022-01-28T12:32:24+5:30

बिहारच्या गया जिल्ह्यातील बोधगया ब्लॉकच्या बगदाहा गावात विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग करावी लागली.

Small army aircraft emergency landing in farm field in Gaya district of Bihar | लष्कराच्या विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग, विमानात होते दोन पायलट

लष्कराच्या विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग, विमानात होते दोन पायलट

Next

गया: बिहारच्या गया जिल्ह्यातील बोधगया ब्लॉकच्या बगदाहा गावात लष्कराच्या एका सूक्ष्म विमानाची शेतात इमरजंसी लँडिंग करावी लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात दोन वैमानिक होते. विमान पडल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. यादरम्यान अनेक जण फोनवर व्हिडिओ बनवू लागले. 

तांत्रिक बिघाड असू शकतो

विमानाची शेतात लँडिंग झाल्यानंतर या विमानातील दोन्ही पायलट बाहेर आले, दोघेही सुरक्षित आहेत. घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. यानंतर पायलटने ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीला (OTA) माहिती दिली. माहिती मिळताच ओटीएचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि किरकोळ नुकसान झालेल्या विमानाला पुन्हा कॅम्पमध्ये आणण्यात आले. सैनिकांनी प्रशिक्षणासाठी मायक्रो एअरक्राफ्टमधून उड्डाण केले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते अनियंत्रित झाले. तपासानंतरच कळेल की यात काही दोष होता की समस्या कुठून आली.

काय म्हणाले विमानतळ संचालक?
दोन्ही वैमानिकांच्या बुद्धीमत्तेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या संदर्भात गया आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक बंगजीत शहा यांनी सांगितले की, गया ओटीए येथील लष्कराचे जवान मायक्रो एअरक्राफ्टने प्रशिक्षणासाठी गेले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमान अनियंत्रित होऊन इमर्जन्सी लँडिंग करुन शेतात उतरले.

Web Title: Small army aircraft emergency landing in farm field in Gaya district of Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.