गुजरातच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट; १७ कामगार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:18 IST2025-04-01T14:07:39+5:302025-04-01T14:18:28+5:30
गुजरातच्या बसनकांठामध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने अनेक कामगारांचा मृत्यू झाला.

गुजरातच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट; १७ कामगार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Banaskantha Firecracker Factory Blast: गुजरातच्या बसनकांठामध्ये भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. बनासकांठा येथील डीसा जीआयडीसीमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्यानंतर आग लागली. आगीमध्ये सुरुवातीला सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर आता हा आकडा वाढला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण कारखान्याचे बांधकाम कोसळलं. त्याखाली देखील काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसामध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटानंतर हा कारखान्याचा काही भाग कोसळला. स्फोटानंतर भिंती आणि छत कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बॉयलरचा स्फोट झाल्याने फटाक्यांच्या कारखान्यात आग लागली. आतापर्यंत सात मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटावेळी कामगार कारखान्यात काम करत होते. अचानक स्फोट झाल्याने मजुरांना पळता आलं नाही. हा स्फोट इतका भीषण होता की अनेक कामगारांच्या शरीराचे भाग दूरवर फेकले. कारखान्याच्या पाठीमागील शेतात शरीराचे काही भागही आढळून आले.
VIDEO | Gujarat: Fire breaks out at a factory near Kuwadwa road in Rajkot. Fire tenders are at the spot. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) April 1, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/NJCYGAtDD4
"आज सकाळी आम्हाला डीसा येथील औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. चार जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोट इतका मोठा होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध मोहीम राबवत आहोत," अशी माहिती बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहीर पटेल यांनी दिली.