शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर ते पंजाबपर्यंत जवानांची कारवाई; सहा दहशतवाद्यांचा खात्मा, 29 लाख रुपयांसह एकाला पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:16 IST

लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देलष्कराने एप्रिल महिन्यात आतापर्यंत 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहेकुलगाममध्येही रविवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलण्यात आलेअमृतसरमध्ये पैसे घेण्यासाठी आलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला पोलिसांनी अटक केली आहे

श्रीनगर/अमृतसर : भारतीय लष्काराने आणि पोलिसांनी रविवारी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये जबरदस्त कारवाई केली. या कारवाईत लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली. एवढेच नाही, तर त्याच्याकडून 29 लाख रुपयेही (भारतीय चलन) जप्त करण्यात आले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत वेगवेगळ्या कारवाईत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  ही कारवाई अनंतनाग आणि पुलवामा येथे करण्यात आली. लष्कराने या चौघांसह केवळ एप्रिल महिन्यातच 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर वर्षभरात एकूण 54 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान -जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्येही रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दक्षिण काश्मिरातील देवासर भागात रविवार सायंकाळी गस्त घालणाऱ्या पार्टीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर संरक्षण दलाच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. या भागात आणखी दोन दहशतवादी लपून बसले अल्याची शंका आहे. त्यांचा शोध सूरू आहे.

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

अमृतसरमध्ये पैसे घेण्यासाठी आला होता हिजबुलचा दहशतवादी -दुसरीकडे पंजाब पोलिसांनीही, हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून 29 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. हिलाल अहमद वागे, असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगाम भागातील रहिवासी आहे. त्याला 25 एप्रिलला अमृतसर येथील मेट्रो मार्टजवळून अटक करण्यात आली.

पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत समोर आले आहे, की काश्मिरातील हिजबुलचा प्रमुख रियाज अहमद नायकू याने मेट्रो मार्टजवळ एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे आणण्यासाठी त्याला पाठवले होते. एक व्यक्ती दुचाकीवर आली आणि हिलालला पैसे देऊन निघून गेली. यावेळी हिलालसह ट्रकमध्ये आणखी एक जण होता. तो अनंतनाग येथील रईस अहमद असल्याचे समजते.

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPunjabपंजाब