शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला सहा जण गमावतात आपला जीव, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 11:10 AM

भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

ठळक मुद्देभारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यूमृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त

नवी दिल्ली - भारतात 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. म्हणजे खड्ड्यांमुळे दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे 2016 मधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृतांचा आकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.  अपघातांच्या या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून खड्ड्यांमुळे वर्षभरात 714 जणांचा मृत्यू झाला असून, यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे 329 जणांनी जीव गमावला आहे. 2016 मध्ये देशभरात एकूण 2424 जण खड्ड्यांचे बळी ठरले आहेत. 

विशेष म्हणजे सर्वात जास्त वाहनसंख्या असणा-या दिल्लीत खड्ड्यांमुळे एकही अपघात झाला नसल्याची नोंद आहे.  सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन, पोलीस कशाप्रकारे अपघाताच्या ख-या कारणाचा शोध न घेता, तपास दुस-या दिशेला वळवतात हे स्पष्ट झालं आहे. प्रवाशांकडून वारंवार रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार केली जात असतानाही गतवर्षी वाहतूक मंत्रालयाने अपघाताची आकडेवारी जाहीर करताना खड्ड्यांमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. 

एका पोलीस अधिका-याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, 'रस्त्यांची मालकी असणा-या एजन्सीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी चर्चा असते, पण त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण फार कमी आहे. अपघातासाठी चालकाला किंवा रस्त्याच्या दुरावस्थेलाच जबाबदार ठरवलं जातं. अनेकदा पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचतात, आणि जखमींचा रुग्णालयात मृत्यू होतो'.

गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याची हौस जिवावर, फक्ता एका वर्षात 2100 जणांचा मृत्यू वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार गतवर्षी गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर केल्याने जवळपास 2138 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रस्ते दुर्घटनांमध्ये होणा-या सर्वात जास्त मृत्यूमागचं मुख्य कारण मोबाइलचा वापर आहे.  वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक आहे. राजधानी दिल्लीत गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एकूण 172 जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्यांदाच वाहतूक मंत्रालयाने राज्यांकडून ही माहिती गोळा केली आहे. 

अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, 'वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने, अपघात होण्याची शक्यता चौपटीने वाढते'. 'सेव्ह लाइफ फाऊंडेशन'ने देखील यासंबंधी एक सर्व्हे केला होता. सर्व्हेमध्ये वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होते असं समोर आलं होतं. सर्व्हेत सहभागी झालेल्या 47 टक्के लोकांनी गाडी चालवताना मोबाइलवर फोन आल्यास आपण उत्तर देतो असं मान्य केलं होतं.  

टॅग्स :Potholeखड्डेAccidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा