शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

सहा जणांना अटक

By admin | Updated: May 3, 2017 06:03 IST

कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांच्यावर शुक्र वारी सायंकाळी ७ च्या सुमारास

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांच्यावर शुक्र वारी सायंकाळी ७ च्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी कर्जत पंचायत समितीचे शिवसेनेचे सदस्य राहुल विशे यांच्यासह अन्य दहा जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सहा आरोपींना नेरळ पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी व अन्य तीन आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आर्ढे येथे ‘गोल्डन वन’ साइट सुरू आहे. या साइटवर पाषाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन शेळके यांना कंपनीने बांधकामाचे मटेरियल सप्लायर्सचे काम दिले आहे. शुक्र वार पाषाणे गावातील २० ते २५ माणसे या कंपनीमध्ये त्यांच्या गाड्या भाड्याने लावण्यासाठी आले होते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशेही तेथे आले. तेव्हा राहुल विशे व त्यांच्यासोबत असलेले २० ते २५ जण आणि सचिन शेळके यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती. राहुल विशे यांनी सचिन शेळके यांच्या डोक्यात वीट मारून जबर दुखापत केली. त्यानंतर त्यांना डिकसळ येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मारहाणी प्रकरणी कर्जत पंचायत समितीचे सदस्य राहुल विशे यांच्यासह दहा जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील संकेत सावंत, नीलेश येवले, स्वप्निल येवले, गुरुनाथ विशे, सचिन झांजे, कृष्णा उर्फ विकी रवींद्र विशे सर्व राहणार पाषाणे या सहा जणांना नेरळ पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली असून, यातील मुख्य आरोपी व अन्य तीन जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)