पाकचे सहा सैनिक ठार; सीमेवर धुमश्चक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:39 IST2019-12-28T06:38:50+5:302019-12-28T06:39:11+5:30

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून आक्रमक प्रत्युत्तर

Six Pak soldiers killed; Smoke on the border | पाकचे सहा सैनिक ठार; सीमेवर धुमश्चक्री

पाकचे सहा सैनिक ठार; सीमेवर धुमश्चक्री

पूँछ : शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी अतिशय आक्रमकपणे उत्तर दिल्याने पाकचे सहा जवानांना ठार झाले आहेत. काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारताच्या हद्दीतील गावांमध्ये पाकिस्तानी लष्करातर्फे वारंवार गोळीबार व तोफांचा मारा सुरू असल्याने भारतीय जवानांनीही त्यांना तसेच उत्तर दिले.

पाकिस्तानी सैनिकांनी पूँछ जिल्ह्यातील राजोरी सेक्टरमध्ये गोळीबार केला आीणि तोफांचाही मारा केला होता. त्यात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तसेच नसीमा बेगम नावाची स्थानिक महिलाही मरण पावली होती. त्यामुळे भारतीय जवानांनी पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिले. बुधवारपासून पाकिस्तान भारतीय हद्दीत गोळीबार करीत आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करीत असतानाच गावांवरही गोळीबार व तोफांचा मारा ते करीत असल्याचे सांगण्यात आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सीमेवरही त्यांनी गोळीबार केला. त्यामुळे सर्व हद्दींवर त्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी अतिशय समर्थपणे उत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे आतापर्यंत सहा जवान ठार झाले आहेत. पाकिस्ताननेही भारतीय गोळीबारात आपले सैनिक ठार झाल्याचे मान्य केले आहे. 

Web Title: Six Pak soldiers killed; Smoke on the border