आग्रा येथे भीषण अपघातात सहा ठार, कारच्या खिडक्या कापून मृतांना काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 02:57 IST2018-01-27T02:57:47+5:302018-01-27T02:57:58+5:30

आग्रा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ता अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर अन्य अनेक जखमी झाले.

Six dead, six car windows were pulled out in Agra and 6 dead | आग्रा येथे भीषण अपघातात सहा ठार, कारच्या खिडक्या कापून मृतांना काढले बाहेर

आग्रा येथे भीषण अपघातात सहा ठार, कारच्या खिडक्या कापून मृतांना काढले बाहेर

आग्रा : आग्रा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ता अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले तर अन्य अनेक जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेहाबाद-बाह मार्गावरील खंडेर गावाजवळ हा अपघात घडला. बाहकडून फराहाबादकडे सफरचंद घेऊन येत असलेल्या ट्रकची समोरून भरधाव येत असलेल्या एका कारसोबत जबरदस्त टक्कर झाली. ही टक्कर झाल्यानंतर ट्रकने दुसºया एका सँट्रो कारला धडक दिली. यावेळी दोन्ही कार ट्रकच्या खाली आल्याने त्यातील सहा जण जागीच ठार झाले. एक कार ट्रकच्या खाली दबल्यानंतर लोकांनी कारच्या खिडक्या कापून मृतांना बाहेर काढले.
या अपघातात सँट्रो कारमधील इटावा निवासी आशिष गुप्ता, रोली (२८), सौरव आणि चालक अमित ठार झाले तर ५० वर्षीय गायत्री देवी गंभीर जखमी झाली. दुसरीकडे वॅगन आरमधील व्यापारी मनोज गुप्ता (रा. मुरैना) आणि चालक मनोज यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कारमध्ये असलेले ७० वर्षीय रामस्नेही गुप्ता आणि ४० वर्षीय दिलीप गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला. त्यामुळे किमान दोन तासपर्यंत वाहतूक ठप्प पडली होती. वॅगन आरमधील लोक एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी फरिदाबादला जात होते तर इटावाहून येणारी कार मुजफ्फरनगरला जात होती. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे.

Web Title: Six dead, six car windows were pulled out in Agra and 6 dead

टॅग्स :Accidentअपघात