अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 22:55 IST2019-11-28T22:47:06+5:302019-11-28T22:55:17+5:30

राज्यसभेत डुलक्या काढणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sitharaman speech on economy fails to impress ministers as many doze off in Rajya Sabha, triggering meme fest | अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या!

अर्थमंत्री राज्यसभेत बोलताना भाजपाच्याच मंत्र्यांच्या डुलक्या!

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी राज्यसभेत देशातील विकास दरावर चर्चा केली. यावेळी देशाचा विकास दर घटला असला तरी याचा परिणाम मंदीवर झाला नसल्याचे आपल्या भाषणात म्हटले होते. दरम्यान, निर्मला सीतारमण यांचे भाषण राज्यसभेतील भाजपाच्याच मंत्र्यांना बहुदा आवडले नसावे. त्यामुळे त्यांचे भाषण सुरु या मंत्र्यांनी राज्यसभेत डुलक्या काढण्यास सुरुवात केली.

राज्यसभेत डुलक्या काढणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात केंद्रीय कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे हे निर्मला सीतारमण यांच्या मागे बसूनच शांत झोपले होते. तर, त्याचवेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूरदेखील डुलक्या काढताना दिसले.

दरम्यान, सोशल मीडियावर यासंदर्भतील फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर लोकांनी मिम्स बनवायला सुरुवात केली. एका युजरने, "निर्मलाजी संसदेत तुमचे भाषण सुरू असताना भाजपाचेच मंत्री झोपले होते, कारण तुमचे भाषण खूप मजेदार आहे... विकासाचा दर खाली आला आहे. मात्र मंदी नाही". याशिवाय आणखी एका युजरने "विकासाचा दर झोपला आहे", असे मजेशीर ट्वीट केले आहे.

Web Title: Sitharaman speech on economy fails to impress ministers as many doze off in Rajya Sabha, triggering meme fest