'म्हणे, टेस्ट ट्युबनं जन्मली सीता'; विप्लव यांच्या 'महाभारता'नंतर दिनेश शर्मांचं 'रामायण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 15:21 IST2018-06-01T15:21:59+5:302018-06-01T15:21:59+5:30

त्रिपुरातले मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे.

sita was born from test tube baby concept ramayana says up deputy cm dinesh sharma | 'म्हणे, टेस्ट ट्युबनं जन्मली सीता'; विप्लव यांच्या 'महाभारता'नंतर दिनेश शर्मांचं 'रामायण'

'म्हणे, टेस्ट ट्युबनं जन्मली सीता'; विप्लव यांच्या 'महाभारता'नंतर दिनेश शर्मांचं 'रामायण'

नवी दिल्ली- त्रिपुरातले मुख्यमंत्री विप्लव देव यांच्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे. मथुरा येथे साजरा होत असलेल्या हिंदी पत्रकारिता दिवसाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सीतेचा जन्म मातीच्या भांड्यामध्ये झाला होता. म्हणजेच त्यावेळी टेस्ट ट्युबनं मुलांना जन्म देण्याची पद्धत प्रचलित होती. त्यामुळे सीतेचा जन्मसुद्धा टेस्ट ट्युबनं झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

रामायण काळात माता सीतेचा जन्म एका मातीच्या भांड्यात झाला होता. त्यामुळे रामायण काळापासून टेस्ट ट्युब बेबीची पद्धत अस्तित्वात होती. इतक्यावरच न थांबता महाभारत आणि रामायण काळाचा हवाला देत त्यांनी भगवान नारदमुनी पत्रकार असल्याचंही म्हटलं आहे. हिंदी पत्रकारिता दिवसाच्या निमित्तानं बोलताना ते म्हणाले, पत्रकारितेची सुरुवात आधुनिक काळात नव्हे, तर महाभारत काळापासून चालत आलेली आहे. महाभारत काळाचं ज्ञानामृत पाजताना ते म्हणाले, गुरुत्वाकर्षण शक्ती, प्लॅस्टिक सर्जरी आणि आण्विक शोध कुठे दुसरीकडे नाही, तर भारतात लागला आहे. तसेच महाभारत काळातही टेक्नॉलॉजी उपस्थित होती. त्यासाठी दिनेश शर्मा यांनी संजय आणि धृतराष्ट्राचं उदाहरण दिलं आहे.

त्या काळातही लाइव्ह टेलिकास्ट होत असल्यानं हस्तिनापुरात बसून संजयनं कुरुक्षेत्रात होत असलेलं महाभारतातलं युद्ध पाहिलं आणि त्याचा इतिवृत्तांत धृतराष्ट्र महाराजांना कथन केला. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपाचे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी महाभारत काळातही इंटरनेट आणि उपग्रह होते, असा चमत्कारिक दावा करून चर्चेत आले होते. एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानं करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी मिस वर्ल्डमधल्या इंडियन ब्यूटीवरूनही वादग्रस्त विधान केलं होतं.  

Web Title: sita was born from test tube baby concept ramayana says up deputy cm dinesh sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.