शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 17:51 IST

कर्नाटकच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात खासदाराचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे.

Prajwal Revanna : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटक असतानाच तिथल्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. कटकातील हसन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्या अश्लील व्हिडिओ वादाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि प्रज्वल यांचे काका एचडी कुमारस्वामी यांनी पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटलंय.

खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडलवरुन कर्नाटकात खळबळ उडाली आहे. कर्नाटक सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रज्वल रेवन्ना जर्मनीला रवाना झाले. 

जेडीएस खासदार रेवन्ना यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने चौकशी सुरु केली आहे. शनिवारी सिद्धरामय्या यांनी तपासाचे आदेश जारी केले. महत्त्वाची बाब म्हणजे रेवन्ना ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते तिथे शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र त्याआधी दोन दिवस हे सगळे अश्लिल व्हिडीओ समोर आले होते.

दुसरीकडे,  पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी या अश्लील व्हिडिओ-फोटोप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवीन गौडा आणि इतर अनेकांनी प्रज्वल रेवण्णाची बदनामी करण्यासाठी हे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचे त्यांनी म्हटले.

पोलिसांत तक्रार दाखल

“नवीन गौडा आणि इतरांनी व्हिडिओ तयार केले आणि हसन लोकसभा मतदारसंघात प्रज्ज्वल रेवन्ना यांची बदनामी करण्यासाठी ते पेन ड्राइव्ह, सीडी आणि व्हॉट्सॲपद्वारे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले. ते लोकांना प्रज्वलला मत देऊ नका असे सांगत होते,"असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

कोण आहे प्रज्वल रेवन्ना?

33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना सध्या कर्नाटकातील हसन येथील खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच ही जागा जिंकली होती. यापूर्वी 2004 ते 2019 पर्यंत एचडी देवेगौडा यांनी या जागेवर सलग विजय मिळवला होता. सध्या रेवन्ना हसन या लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Karnatak Politicsकर्नाटक राजकारणCrime Newsगुन्हेगारी