सिन्नर अल्पवयीन मुलगी खूनप्रकरणी जन्मठेप
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:45+5:302015-08-08T00:23:45+5:30
सोनांबे येथील २०१४ मधील घटना

सिन्नर अल्पवयीन मुलगी खूनप्रकरणी जन्मठेप
स नांबे येथील २०१४ मधील घटना नाशिक : सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील सातवर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून शालेय दफ्तराने तिचा गळा आवळून ठार करणारा आरोपी गणेश भाऊराव पवार (वय २१, सोनांबे, ता़ सिन्नर, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ गतवर्षी मार्च महिन्यात ही घटना घडली होती़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, ६ मार्च २०१४ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सातवर्षीय शाळकरी मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली, मात्र शाळेत पोहोचलीच नाही़ यानंतर तिच्या कुटुंबीय तसेच गावातील नागरिकांनी या मुलीचा खूप शोध घेतला होता़ यानंतर तब्बल सहा दिवसांची म्हणजेच १२ मार्चला कोनांबे शिवारातील कावळे मळ्यातील गट नंबर ६३५ मधील उसाच्या शेतात या मुलीचा मृतदेह आढळून आला होता़शेतात या मुलीचे दोन्ही हात व पाय बांधलेले तर गळ्याभोवती दफ्तराचा बेल्टचा फास आवळलेला होता़ तसेच सहा दिवस मृतदेह एकाच जागेवर असल्याने कुजून गेला होता़ मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती़ यानंतर पोलिसांनी या मुलीच्या घरी पूर्वी गुरे चारण्याचा काम करणार्या गणेश पवार यास अटक केली होती़ हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांच्या न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुप्रिया गोरे यांनी सतरा साक्षीदार तपासून न्यायालयात आरोपी पवारविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़ त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)