सिंहगड घे-यात चो-यांचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: April 4, 2015 01:54 IST2015-04-04T01:54:59+5:302015-04-04T01:54:59+5:30
पुणे : सिंहगड घे-याच्या परीसरामध्ये गेल्या काही दिवसात चो-या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात असलेल्या आनंदवन सोसायटीमध्येही आतापर्यंत जवळपास 15 घरफोड्या झाल्यामुळे रहीवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंहगड घे-यात चो-यांचे प्रमाण वाढले
प णे : सिंहगड घे-याच्या परीसरामध्ये गेल्या काही दिवसात चो-या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात असलेल्या आनंदवन सोसायटीमध्येही आतापर्यंत जवळपास 15 घरफोड्या झाल्यामुळे रहीवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड किल्ल्याच्या जवळच आनंदवन सोसायटी ही फार्म हाऊसची सोसायटी आहे. याठिकाणी दैनंदिन वास्तव्य करणा-यांची संख्या कमी आहे. शनिवार रविवार याठिकाणी लोक रहायला येतात. अशीच घरे निवडून चोरट्यांनी मौल्यवान ऐवज, रोकड आणि घरातील सामान लंपास केले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे याबाबत वारंवार तक्रारी करुनही अद्याप चोरट्यांचा शोध लागू शकलेला नाही. चो-यांचे प्रमाण कमी करुन चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. दर दोन तीन दिवसांना होणा-या चो-यांमुळे नागरिक वैतागले आहेत. नुकतीच याविषयावर पोलीस आणि स्थानिकांची बैठक झाली. यावेळी नागरिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर पोलिसांनी सोसायटीच्या सभासदांना याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची, सीसीटीव्ही बसवण्याच्या सुचना केल्या. याभागात गस्त वाढवण्याबरोबर पोलिसांचा वावर ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली.