शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

Single Use Plastic Ban : सिंगल यूज प्लास्टिकवर लवकरच बंदी; चमचे, ग्लासपासून इअरबडपर्यंत 'या' वस्तू होणार बॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:42 PM

सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. या प्लास्टिक उत्पादनांमुळे पर्यावरणाची दीर्घ हानी होते. हे नुकसान लक्षात घेत ऑगस्ट 2021मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती.

पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकच्या चमच्यांपासून ते इअरबड्सपर्यंत अनेक वस्तूंवर 1 जुलैपासून बंदी घालण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) उत्पादन, साठवणूक, वितरण आणि वापराशी संबंधित सर्व संस्थांना नोटीस जारी केली आहे. यात 30 जूनपूर्वी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदीची तयारी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

सिंगल यूज प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. या प्लास्टिक उत्पादनांमुळे पर्यावरणाची दीर्घ हानी होते. हे नुकसान लक्षात घेत ऑगस्ट 2021मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली होती. त्यात, 1 जुलैपासून अशा सर्व वस्तूंवर बंदी घालण्यास सांगितले गेले होते. याच पार्श्वभूमीवर सीपीसीबीने सर्व संबंधित पक्षांसाठी नोटीस जारी केली आहे. 30 जूनपर्यंत या वस्तूंवर बंदी घालण्याची सर्व तयारी पूर्ण करावी, असे यात सांगण्यात आले आहे.

'या' वस्तूंवर घालण्यात येणार बंदी -सीपीसीबीच्या नोटिशीनुसार, 1 जुलैपासून प्लास्टिक स्टिक असलेल्या इअरबड, फुग्याला असलेली प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आईसक्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल, आदिंचा समावेश आहे. याच बरोबर प्लास्टिक कप, प्लेट, ग्लास, काटा, चमचे, चाकू, स्ट्रॉ आणि ट्रे सारख्या कटलेरी वस्तू, मिठाईचे डिब्ब्यांवर लावले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिकच्या आमंत्रण पत्रिका, 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेले पीव्हीसी बॅनर आदींचाही यात समावेश असेल.

नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई - महत्वाचे म्हणजे, सीपीसीबीने जारी केलेल्या या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यात उत्पादन जप्त करणे, पर्यावरणाची हानी केल्याबद्दल दंड आकारणे, तसेच, त्यांच्या उत्पादनाशी संबंधित उद्योग बंद करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीIndiaभारतMarketबाजार