गायक किशोरकुमार यांना चाहत्यांची आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 12:30 IST2017-08-05T12:30:50+5:302017-08-05T12:30:53+5:30

Singer Kishore Kumar honored fans | गायक किशोरकुमार यांना चाहत्यांची आदरांजली

गायक किशोरकुमार यांना चाहत्यांची आदरांजली

बु-हाणपूर (मध्य प्रदेश), दि. 5 -  दिवंगत गायक किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त खंडवा येथील किशोरकुमार यांच्या समाधीस्थळी चाहते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. किशोरकुमार यांचे समाधीस्थळ पुष्पहारांनी  आकर्षकरित्या सजवण्यात आले होेते. सकाळपासूनच त्यांच्या चाहत्यांनी समाधीस्थळी गर्दी केली होती.

आयएएस, आयपीएस अधिका-यांसोबतच नेत्यांपासून, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस्थळी हजेरी लावून किशोरकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. देशाच्या विविध भागातील किशोरप्रेमींनीदेखील समाधीस्थळी उपस्थित राहून त्यांना आदरांजली अर्पण केली. किशोर सांस्कृतिक प्रेरणा मंचने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Web Title: Singer Kishore Kumar honored fans