स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सिंगारे?
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:02+5:302015-02-15T22:36:02+5:30
महापालिका : कोर कमिटीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सिंगारे?
म ापालिका : कोर कमिटीच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तबनागपूर : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांचा कार्यकाळ संपत आला आहे. आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे हे या पदासाठी प्रबळ दावेदार असून, त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. सोमवारी मनपाच्या आमसभेत स्थायी समितीच्या नवीन आठ सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. यात नागपूर शहर विकास आघाडीचे पाच, बसपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश राहणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. यात सुनील अग्रवाल, चेतना टांक, नीता ठाकरे आदींचा समावेश आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी सिंगारे यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे. मध्य नागपुरातील दयाशंकर तिवारी, दक्षिण-पश्चिम मधील अविनाश ठाकरे व पूर्व नागपुरातून बाल्या बोरकर आदींनी यापूर्वी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे दक्षिण नागपुरातील सिंगारे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. याच भागातील डॉ. छोटू भोयर यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी निवड झाली असून, सुधाकर कोहळे आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यामुळे सिंगारे यांची निवड निश्चित मानली जात आहे. (प्रतिनिधी)चौकट...कोर कमिटीची सोमवारी बैठक भाजपच्या कोर कमिटीची बैठक सोमवारी सकाळी होत आहे. यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाईल. अद्याप कुणाचेही नाव निश्चित झाले नसल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली.चौकट... सदस्यपदासाठी रस्सीखेचस्थायी समितीवर निवड व्हावी, अशी बहुसंख्य सदस्यांची इच्छा असते. त्यामुळे सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात आघाडीच्या मित्र पक्षाच्या काही सदस्यांचाही समावेश आहे.