शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

मोदींची 'शंभर नंबरी' चूक; सिक्किम देशातलं शंभरावं विमानतळच नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 2:46 PM

सिक्किम विमानतळाचं उद्घाटन करताना मोदींनी दिली चुकीची आकडेवारी

मुंबई: आज देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज देशाला 100 वं विमानतळ मिळालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सिक्किममध्येविमानतळाचं लोकार्पण करताना म्हटलं. मोदींनी काल सिक्किममध्ये पाकयोंग विमानतळाचं उद्धाटन केलं. भाजपा सरकारच्या काळात वेगानं विमानतळांची कामं मार्गी लागत असल्याचं मोदींनी म्हटलं. मात्र मोदींनी सांगितलेला विमानतळांचा आकडा पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील एकूण विमानतळांची संख्या सव्वाशेहून अधिक आहे. पंतप्रधान मोदींनी फक्त देशातील कार्यान्वित असलेल्या विमानतळांचा आकडा सांगितला, असं लक्षात घेतलं तरीदेखील आकडेवारी जुळत नाही. कारण मोदींनी सांगितलेली आकडेवारी आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी यात मोदी तफावत आहे. पाकयोंग हे देशातील शंभरावं विमानतळ आहे, या मोदींचा दावा डीजीसीएच्या (नागरी विमान उड्डाण संचलनालय) आकडेवारीनंदेखील खोटा ठरवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संस्था सरकारच्या अखत्यारित येतात. नागरी विमान उड्डाण संचलनालय (डीजीसीए) देशातील नागरी उड्डाणाचं नियंत्रण करतं. तर भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) देशातील विमानतळांच्या उभारणीचं, त्यांच्या देखभालीचं आणि व्यवस्थापनाचं काम करतं. नागरी विमान उड्डाण संचलनालयची आकडेवारी काय सांगते?नागरी विमान उड्डाण संचलनालयाच्या 2017-18 च्या अहवालानुसार, देशातील एकूण विमानतळांची संख्या 129 इतकी आहे. यामध्ये 23 आंतरराष्ट्रीय, 78 देशांतर्गत, 8 कस्टम विमानतळांचा समावेश आहे. तर 20 विमानतळं संरक्षण दलांकडे आहेत. हा अहवाल डीजीसीएनं 5 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध केला आहे. देशातील 129 विमानतळांपैकी 101 विमानतळं वापरात आहेत.विशेष म्हणजे ही आकडेवारी सरकारनंच 19 जुलै 2018 आणि 8 ऑगस्ट 2018 रोजी लोकसभेत दिली होती. तर देशातील कार्यान्वित विमानतळांची संख्या 110 असल्याचं डीजीसीएचा अहवाल सांगतो. हा अहवाल 31 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आकडेवारी काय सांगते?भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2018 रोजी देशातील 26 आंतरराष्ट्रीय, 74 देशांतर्गत आणि 8 कस्टम विमानतळं कार्यान्वित होती. त्यामुळे आपण जरी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांची बेरीज केली तरी, हा आकडा 100 होतो. त्यामुळे सिक्किममधील विमानतळचा क्रमांक 101 होतो. त्यामुळे मोदींनी सांगितलेली आकडेवारी चुकीची ठरते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीsikkimसिक्किमAirportविमानतळ