देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. कोरोनावर (Coronavirus नियंत्रण मिळवण्यासाठी देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम (Vaccination Drive in India) हाती घेण्यात आली आहे. दरम्यान १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे एक्सिक्युटिव्हा डायरेक्टर सुरेश जाधव यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. “केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबद्दल माहिती न घेता तसंच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवाय अनेक वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिली,” अशी माहितीही त्यांनी दिली. हील हेल्थद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ई समिटमध्ये बोलताना जाधव यांनी हे वक्तव्य केलं. “देशानं जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला हवं. त्याच्यानुसार लसीकरण केलं गेलं पाहिजे,” असं जाधव यांनी स्पष्ट केलं.
सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 10:47 IST
Coronavirus Vaccine : WHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्याशिवा. सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत.
सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही...
ठळक मुद्देWHO च्या मार्गदर्शक सूचनांवर विचार केल्या सर्व वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला मान्यता, SII च्या अधिकाऱ्यांचं मत.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून करण्यात येत आहे कोविशिल्डचं उत्पादन.