शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; दिल्ली दरबारी हाचलाची सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:06 IST

पटोले व थोरात यांच्यातील तणावानंतर थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजधानीतून मिळत असलेल्या संकेतांनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांना महाराष्ट्र काँग्रेसच्या संकटावर अहवाल देण्यास सांगितले आहे. दिल्ली श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरात यांना सांगितले आहे की, आपल्याला विधिमंडळ पक्षनेते पदावर राहायचे नाही, ही बाब तुम्ही आमच्यावर सोडा.

पटोले व थोरात यांच्यातील तणावानंतर थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमवेत काम करू शकत नाही, असे म्हटले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी एका मंचावरून पत्रपरिषद घेतली तेव्हा अनेकांना वाटले की, असे काय झाले आहे की, दोघे एका मंचावर येण्यास राजी झाले? 

दिल्ली श्रेष्ठींनी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांना संदेश देऊन थोरात यांच्याकडे पाठवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एच. के. पाटील यांनी थोरात यांना दिल्ली श्रेष्ठींचा संदेश पोहोचवला आणि सांगितले की, रायपूरमध्ये होणारे अधिवेशन व महाराष्ट्रातील पोटनिवडणुकांपर्यंत आपण सहकार्य करावे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राबाबत फैसला करणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात