शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moosewala Murder: 'सिद्धू मूसेवाला आमचा भाऊ होता, दोन दिवसात निकाल लावू', नीरज बवाना गँगने दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:08 IST

Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोई गँग आणि बवाना गँग आमने-सामने आले आहेत.

Sidhu Moose Wala Murder Case: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय पक्षांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्यावर हत्येचा आरोप आहे. यावरुन आता सोशल मीडियावर एक टोळीयुद्ध सुरू झाले आहे. कॅनडात लपून बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रारने मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यापासून, बंबिहा गट सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे आणि बदला घेण्यासाठी लॉरेन्स ग्रुपला सतत धमकावत आहे.

अनेक गँग एकवटल्याफेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, नीरज बवाना टोळीने सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा निषेध केला आणि "दोन दिवसात निकाल लाऊ" असे म्हणत सूड घेण्याची धमकी दिली. बवाना नावाच्या हँडलने पोस्ट शेअर केली आहे. टिल्लू तेजपुरिया, कौशल गुडगाव आणि दविंदर बंबीहा टोळीचाही बवाना गँगशी संबंध आहे. एका पोस्टमध्ये गँगस्टर कुशल चौधरीने गायक मनकिरत औलख आणि गँगस्टर लॉरेन्स याच्या फोटोवर क्रॉसही टाकला आहे.

नीरज बवाना तिहार तुरुंगात नीरज बवाना याला पोस्टमध्ये टॅग केले आहे. बवनावर खून व खंडणीचे अनेक गुन्हे असून, तो सध्या तिहार तुरुंगात आहे. नीरज बवानाचे अनेक साथीदार दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये पसरलेले आहेत. ही फेसबुक पोस्ट नीरज बवाना टोळीचा सदस्य भूप्पी राणा नावाच्या हँडलने टाकली आहे. पोस्टमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यावर टीका करण्यात आली होती.

बिष्णोई टोळीचा खोटा आरोपलॉरेन्स बिश्नोई ग्रुपच्या नावाच्या अकाउंटवरुन मुसेवालाच्या हत्येनंतर पोस्ट केले की, ही हत्या अकाली दलाचे नेते विक्रमजीत सिंग (विकी मिड्डूखेडा) याच्या हत्येचा बदला आहे. गेल्या वर्षी मिद्दुखेडावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तेव्हा बंबीहा टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. भूप्पी राणा हँडलच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, बिश्नोई टोळीने मिद्दुखेडा आणि पंजाबमधील विद्यार्थी नेता गुरलाल बारा याच्या हत्येत मूसेवालाने मदत केल्याचा खोटा आरोप केला आहे. या हत्यांमध्ये सिद्धू मुसेवालाची कोणतीही भूमिका नव्हती. सिद्धू मुसेवाला आमचा भाऊ होता, त्याच्या हत्येत मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हिशोब घेतला जाईल. त्याच्या मृत्यूचा लवकरच बदला घेतला जाईल, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :PunjabपंजाबDeathमृत्यूPoliceपोलिसcongressकाँग्रेस