शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सिद्धरामय्या पुन्हा चर्चेमध्ये, कर्नाटकातील सरकार डळमळीत होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 3:35 PM

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही.

बंगळुरु- कर्नाटकात जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस यांचे एकत्र सरकार सत्तेत येऊन एक महिना उलटला तरी या आघाडीमध्ये अजूनही फारसं काही आलबेल नसल्याचे दिसते. त्यातच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यारोधात उघड भूमिका घेतल्यामुळे आता ते पुन्हा चर्चेमध्ये आले आहे. सिद्धरामय्या यांच्या भूमिकेवर काही काँग्रेस सदस्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कर्नाटकातील आघाडीतील सत्ताधारी एकमेकांवरील आरोपांमध्ये गुंतलेले दिसून येतात. सिद्धरामय्या हे काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते आहेत आणि दोन्ही पक्षांमधील संवाद समितीचे अध्यक्षही आहेत.कर्नाटकातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्द्यावर आणि स्वतंत्र नवा अर्थसंकल्प मांडण्याच्या कुमारस्वामी यांच्या निर्णयावर सिद्धरामय्या यांनी उघड टीका केली आहे. फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अंतरिम संकल्पाला कायम ठेवावे फारतर एखादा पुरवणी संकल्प मांडावा असे त्यांनी सुचवले होते. मात्र कुमारस्वामी यांनी आपण स्वतंत्र नवा अर्थसंकल्प मांडूच अशी भूमिका घेतली.सिद्धरामय्या यांचे समर्थक आणि काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी आपल्या नेत्याचा अपमान केला तर काही मिनिटांमध्ये सरकार पाडू असे विधान केले आहे.काँग्रेसने जनता दल सेक्युलरला विनाशर्त पाठिंबा देण्याचे निस्चित केल्यावर काही काँग्रेस नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच कुमारस्वामी पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी होईल असे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने परस्पर जाहीर केल्यावर कर्नाटक राज्यातील काँग्रेस नेत्यांमा आश्चर्याचा धक्का बसला होता. सिद्धरामय्यांच्या निकटवर्तियांना मंत्रीमंडळात फारसे स्थान न मिळणे तसेच चांगली खाती न मिळणे हासुद्धा एक नाराजीचा मुद्दा बनला आहे.कुमारस्वामींनी 52 अभियंत्यांची पदोन्नती तसेच बदल्या केल्यानंतरही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मुख्यंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून नेमणे तसेच नागतिहळ्ळी चंद्रशेखर यांची फिल्म अकादमीवर अध्यक्ष म्हणून निवड होणे सुद्धा काँग्रेसला पसंत पडलेले नाही. हे निर्णय दोन्ही पक्षांच्या एकत्र समितीने घ्यायला हवेत असे काँग्रेसला वाटते.

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण