लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:57 IST2025-09-09T17:56:07+5:302025-09-09T17:57:36+5:30

siachen avalanche glacier ladakh : लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांचे बचावकार्य सुरू

siachen glacier ladakh avalanche killed indian army soldiers many trapped under snow | लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू

siachen avalanche glacier ladakh : लडाखमधील सियाचीन ग्लेशियरवर एका मोठ्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे, जिथे सैनिकांना -६० अंश थंडी, जोरदार वारे आणि बर्फाच्छदित आव्हानांचा सामना करावा लागतो. आज येथे झालेल्या हिमस्खलनात वादळ एका लष्करी चौकीवर आदळले. त्यामुळे तीन जवानांना वीरमरण आले. लेह आणि उधमपूरची मदत घेत लष्कराच्या बचाव पथकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आहे.

बचाव कार्य आणि सैन्याचे प्रयत्न

हिमस्खलनाची बातमी मिळताच, भारतीय सैन्य आणि हवाई दलाने तातडीने बचाव कार्य सुरू केले. विशेष हिमस्खलन बचाव पथके (एआरटी) घटनास्थळी पोहोचली, जी बर्फात गाडलेल्या सैनिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पथक लेह आणि उधमपूर येथून समन्वय साधत आहेत. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी चित्ता आणि एमआय-१७ सारख्या लष्कराच्या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. सियाचीनमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सैन्य नेहमीच तयार असते, परंतु बर्फ आणि थंडीमुळे बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होऊन बसते.

यापूर्वीही अनेकदा घडलाय दुर्दैवी प्रसंग

हिवाळ्यात सियाचीनमध्ये हिमस्खलन होणे सामान्य आहे. १९८४ मध्ये ऑपरेशन मेघदूत झाल्यापासून, हवामानामुळे १,००० हून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. काराकोरम पर्वतरांगेत २०,००० फूट उंचीवर असलेले सियाचीन ग्लेशियर येथे घडलेली बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. अशा घटना यापूर्वी सियाचीनमध्ये घडल्या आहेत. पण यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

जोरदार वारे, हिमवादळे आणि हिमस्खलन हे येथे सामान्य आहे. पण त्यापासून जवानांचा बचाव कसा करता येईल, याबाबत अद्याप ठोस बचाव पर्याय मिळू शकलेले नाहीत. हिमस्खलन उत्तरेकडील हिमनदी प्रदेशात झाले, जिथे उंची १८,००० ते २०,००० फूट आहे. या भागात सैनिकांना केवळ शत्रूशीच नाही, तर निसर्गाच्या प्रकोपाशीही लढावे लागते.

Web Title: siachen glacier ladakh avalanche killed indian army soldiers many trapped under snow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.