लखनौ - “संपूर्ण चित्र पालटत आहे आणि मला वाटते भविष्य अतिशय उज्ज्वल आहे, २०४० पर्यंत भारत मानवी चांद्र मोहीम साध्य करेल आणि त्या वेळी कदाचित तुम्हांपैकी कुणी चंद्रावर पाऊल ठेवेल,” असे अवकाशवीर शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी सांगितले. आपल्या यशामागे फक्त चिकाटीच कारणीभूत ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ॲक्सिओम-४ अवकाश मोहिमेद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय शुक्ला आज सकाळी प्रथमच आपल्या मूळगावी लखनौ येथे पोहोचले. सिटी मॉन्टेसरी स्कूल या आपल्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले, “भविष्यातील अवकाश संशोधन फारच आशादायी आहे. आज आपण योग्य वेळी आणि योग्य संधींच्या टप्प्यावर उभे आहोत.”
चिकाटी हवी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “तुम्ही भविष्यात किती पुढे जाल, याची मी फक्त कल्पना करू शकतो. यशासाठी फक्त चिकाटी हवी, दुसरे काही नाही.”
लखनौमध्ये भव्य स्वागतशुभांशू शुक्ला सोमवारी आपल्या लखनौच्या गावी परतले, तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो नागरिक जमले होते. ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.