शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:20 IST

Shubman Gill: शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला.

नवी दिल्ली: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी येत आहे. भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आज चेन्नईहून अहमदाबादला रवाना होणार आहे. त्याची प्रकृती बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरू राहणार असून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो. 

शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला. आता गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. येथे १४ ऑक्टोबरला भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. बीसीसीआयकडून गिलच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की गिल आज अहमदाबादला पोहचेल आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली तो राहील, असं सांगण्यात येत आहे. मात्र आगामी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गिल खेळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शुभमन गिल यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्या शरीरातील प्लेटलेट संख्या एक लाखापेक्षा कमी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, केवळ एक रात्र राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहमदाबादच्या उन्हात एकदिवसीय सामने खेळण्यासाठी उत्तम फिटनेस आवश्यक आहे. त्यामुळे गिलसमोर सामन्यासाठी फिट होण्याचे मोठे आव्हान असेल. शुभमन गिल हा भारताकडून यावर्षी वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २० डावात १२३० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ७२.३५ आणि स्ट्राइक रेट १०५.०३ आहे. त्याने या वर्षी वनडेत द्विशतकही झळकावले आहे. शुबमन गिल हा विश्वचषकात भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा फलंदाज आहे. अहमदाबादच्या मैदानात गिलचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन ही भारतासाठी अत्यंत आनंददायी बाब असेल.

वनडे विश्वचषकाच्या सलामी लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दडपणाचा सामना करीत विजय मिळविणारा भारतीय संघ बुधवारी दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर एकतर्फी वर्चस्व गाजविण्यास उत्सुक आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्मा याने वेगवेगळ्या ठिकाणी परिस्थितीनुसार खेळण्याचे आमच्यापुढे आव्हान असेल, असेही म्हटले आहे. अफगाणिस्तानचा मारा ऑस्ट्रेलियासारखा मुळीच नाही. कोटला  मैदान आकाराने लहान असल्याने षट्कारांची आतषबाजी अपेक्षित आहे. विश्वचषकाआधी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे स्वरूप वेगळे आहे. विराट घरच्या मैदानावर खेळणार असल्याने चेन्नईतील खेळीची पुनरावृत्ती करण्याची त्याच्याकडून अपेक्षा बाळगण्यात येत आहे. 

टॅग्स :Shubhman Gillशुभमन गिलICC One Day World Cupवन डे वर्ल्ड कपIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघIndiaभारतAfghanistanअफगाणिस्तान