शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शुभा मुद्गल, राकेश चौरसिया, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण (भाग १)

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

- पं. सी. आर व्यास संगीत महोत्सव आजपासून : सप्तक, महाराष्ट्र ललित कला निधी

- पं. सी. आर व्यास संगीत महोत्सव आजपासून : सप्तक, महाराष्ट्र ललित कला निधी
नागपूर : ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. सी. आर. व्यास यांनी अनेक उत्तमोत्तम बंदिशी रचल्या. त्यांच्या बंदिशी देशभरात अनेक गायक सादर करतात. पं. सी. आर व्यास यांची अखेरची मैफिल नागपुरात झाली आणि त्यानंतर आठवडाभरातच त्यांचे निधन झाले. त्यामुळेच नागपूरशी आपले भावनिक संबंध आहेत. त्यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त सप्तक आणि महाराष्ट्र ललित कला निधी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. सी. आर. व्यास स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि ज्येष्ठ संतूरवादक पं. सतीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात प्रख्यात गायिका शुभा मुद्गल, संतूरवादक पं. सतीश व्यास, शौनक अभिषेकी, युवा बासरीवादक राकेश चौरसिया, गायक राहुल देशपांडे, सितारवादक शुभेंद्र राव आणि चेलोवादक सास्कीया राव हे दिग्गज कलावंत सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागपूरकर रसिकांना महोत्सवात मेजवानी मिळणार आहे. हा महोत्सव तीनही दिवस सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. महोत्सवात सर्व रसिकांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने महोत्सवाला प्रारंभ करण्यात येईल. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि नव्या पिढीचे दमदार गायक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यानंतर संतूरवादक पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन होईल. प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य असलेल्या पं. सतीश त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संतूरवादनासाठी देश-विदेशात लोकप्रिय आहे.
१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध सितारवादक शुभेंद्र राव आणि चेलोवादक सास्कीया राव यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. शुभेंद्र आणि सास्कीया सुप्रसिद्ध सितारवादक पं. रविशंकर यांचे शिष्य आहे. यानंतर लोकप्रिय भजन व ठुमरी गायिका शुभा मुद्गल यांचे गायन रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाची सांगता १४ फेब्रुवारी रोजी युवा बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या बासरीवादनाने क रण्यात येईल. ते प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. त्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.