Shraddha Murder Case: आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 19:56 IST2022-11-28T19:17:34+5:302022-11-28T19:56:58+5:30

Delhi Murder Case: श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी आफताब पूनावालाला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनवर तलवारीने हल्ला.

Shraddha Murder Case: Police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla attacked by at least 2 men carrying swords | Shraddha Murder Case: आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...'

Shraddha Murder Case: आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर तलवारीने हल्ला, हल्लेखोर म्हणाले- 'त्याला बाहेर काढा...'

Delhi Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली होती. यादरम्यान, काही लोकांच्या जमावाने वाहनावर हल्ला केला. 

व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये एकाच्या हातात तलवार दिसत होती. त्याने व्हॅनवर तलवारीने वार केले आणि व्हॅनचा दरवाजा उघडला. पण, तेवढ्यात पोलिस तिथे आले आणि त्यांनी बंदूक काढली. यावेळी हल्लेखोर म्हणाले- त्याला बाहेर काढाला, आताच मारू...पोलिसांच्या सतर्कतेमुळे आफताबचा जीव वाचला. 

यावेळी नाराज जमावाने पोलिस व्हॅनवर दगडफेकही केली. यावेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे लोक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन व्हॅन काढली आणि आफताबला सुरक्षित नेले.

Web Title: Shraddha Murder Case: Police van carrying Shradhha murder accused Aftab Poonawalla attacked by at least 2 men carrying swords