करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 06:32 IST2023-01-15T06:31:06+5:302023-01-15T06:32:44+5:30

मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. 

shraddha murder case aftab cut the dead body into 35 pieces using a saw | करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

करवत वापरून आफताबने  केले मृतदेहाचे ३५ तुकडे; जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचे

लोकमत न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आरोपी आफताब पुनावाला याने करवतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होतेअशी माहिती ‘शवविच्छेदन विश्लेषणातून (पोस्टमॉर्टम नालिसिस) समोर आली आहे.

आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होतेदिल्ली पोलिसांनी एम्स रुग्णालयात मंगळवारी २३ तुकड्यांचे ‘शवविच्छेदन विश्लेषण’ केले होतेत्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहेमृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवतीचा वापर करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहेयाप्रकरणी दिल्ली पोलिस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

१० जानेवारी रोजी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीश्रद्धा आणि आफताब हे ‘लिव्ह इनमध्ये राहत होते१८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली होती१२ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली होती.

Web Title: shraddha murder case aftab cut the dead body into 35 pieces using a saw