पुरवठा कमी झाल्याने सिलिंडरचा तुटवडा
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:46+5:302015-02-15T22:36:46+5:30
नागपूर: मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यानेच जिल्ात तुटवडा निर्माण झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. येत्या काळात पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिल्याने समस्या दूर होण्याची शक्यता आहे.

पुरवठा कमी झाल्याने सिलिंडरचा तुटवडा
न गपूर: मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी होत असल्यानेच जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाल्याचे तपासणीत दिसून आले आहे. येत्या काळात पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन कंपन्यांनी दिल्याने समस्या दूर होण्याची शक्यता आहे.एचपीचे सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून वाढत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून याची दखल घेत काही काही गॅस एजन्सीला भेटी दिल्या. त्यात कामठी, वाडी येथील एकूण तीन एजन्सीचा समावेश आहे. तेथील तपासणी अंती मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून आले. मुंबईतूनच कमी पुरवठा होत आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करण्यात आले. त्यांनी पुरवठा वाढवून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढच्या काळात सिलिंडरचा तुटवडा राहणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले. डिप्टी सिग्नल भागात सापडलेल्या सिलिंडर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सापडलेल्या एकूण ८२ सिलिंडर पैकी ७९ रिकामे होते. हे सर्व सिलिंडर व्यावसायिक होते. विविध गॅस एजन्सीवर होत असलेल्या गर्दी मागे सिलिंडर न मिळणे हेच एकमेव कारण नसून डीबीटीएलसाठी नोंदणी,गॅस जोडण्यांबाबत असलेल्या तक्रारी यासह इतरही अनेक कारणे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)