थोडक्यात नागपूर

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:56+5:302015-02-15T22:36:56+5:30

शिक्षकांना फिल्ड वर्क देऊ नका : महापौर

In short, Nagpur | थोडक्यात नागपूर

थोडक्यात नागपूर

क्षकांना फिल्ड वर्क देऊ नका : महापौर
नागपूर : अतिरिक्त ठरवून कर विभागात पाठविण्यात आलेल्या शिक्षकांच्या समस्यांबाबत मनपा शिक्षक संघाचे शिष्टमंडळ महापौरांना भेटले. याप्रसंगी महापौरांना विविध झोनमध्ये शिक्षकांना येणाऱ्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले. कर आकारणी विभागाचे सभापती गिरीश देशमुख तसेच कर आकारणी विभागाचे प्रमुख हस्तक उपस्थित होते. यावेळेस महापौरांनी शिक्षकांना फिल्ड वर्क देऊ नका, असे आदेश दिले. त्यांना टेबल वर्क देण्यात यावे, तसेच सकाळी १०.१५ ते ५.४५ ही वेळ ठरवावी, असा निर्णय घेतला. नियमानुसार सार्वजनिक सुट्ट्या आणि रविवारी कामावर बोलावू नये, असे ते म्हणाले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, देवराव मांडवकर, संतोष विश्वकर्मा, मलविंदरसिंग कौर लांबा, कल्पना महल्ले, अख्तर खान, रामराव बावणे, मधुकर भोयर, अशोक बालपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------
दिगंबर जैन युवक मंडळ
नागपूर : दिगंबर जैन युवक मंडळाचा २७ वा वर्धापनदिन उज्ज्वल गोरक्षण केंद्र येथे अशोकराव चवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नारायणराव पळसापुरे, सुनील भुसारी, संतोष सावळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नारायणराव पळसापुरे, अशोक चवडे यांनी नरेंद्र भुसारी यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी अर्चना शहाकार यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी महिला सक्षमीकरण विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. याप्रसंगी स्मिता श्रावणे, माया सावळकर, वीणा झवेरी, नमिता उदेपूरकर, अविनाश शहाकार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनय सावळकर, ॲड. विकास श्रावणे, किशोर महात्मे, प्रमोद भागवतकर, श्रीकांत धोपाडे, स्मिता महात्मे, प्रतिभा नखाते, जयश्री भुसारी, मनीषा रोहणे, मनीषा सावळकर, वैशाली मानेकर, वर्षा महात्मे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: In short, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.