धक्कादायक! खेळत-खेळत दोन चिमुकल्या कारमध्ये बसल्या, गुदमरून दोघींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:24 IST2025-04-15T17:59:08+5:302025-04-15T18:24:28+5:30
दोन चिमुकल्या बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरूवात केली. शोधाशोध केल्यानंतर कारमध्ये दोघींचा मृतदेह सापडला.

धक्कादायक! खेळत-खेळत दोन चिमुकल्या कारमध्ये बसल्या, गुदमरून दोघींचा मृत्यू
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन चुलत बहिणींचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. त्या दोघीही फक्त चार ते पाच वर्षाच्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरात कोणत्यातरी विषयावर चर्चा करत होते.त्यावेळी त्या चिमुकल्या खेळायला बाहेर आल्या आणि पार्किंग केलेल्या कारमध्ये बसल्या. यानंतर सुमारे दीड ते दोन तासांनंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पाहिले पण वेळ गेली होती.
ही घटना चेवेल्ला पोलिस ठाणे हद्दीतील दमरागिरी गावात घडली. मृत मुलांची ओळख पटली, थानु श्री (४) आणि अभिनय श्री (५). पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १४ एप्रिल रोजी सकाळी दोन्ही मुलांचे पालक त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी गेले होते. दोन्ही मुलेही त्यांच्या पालकांसोबत गेले होते.
मुस्कान -साहिलच्याही एक पाऊल पुढे, महिलेचे २ तरुणांशी संबंध; पतीविरोधात रचला डाव अन्...
घरात चर्चा सुरू होती. यावेळी थानू श्री आणि अभिनय श्री बाहेर गेले. खेळत खेळत त्या दोघींनी कारचा दरवाजा उघडला आणि कोणालाही न कळता गाडीच्या आत बसल्या. ते गाडीत शिरताच दरवाजे बंद झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे एक तासानंतर, पालकांना मुले बेपत्ता असल्याचे लक्षात आले, त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. शक्य तितक्या सर्व ठिकाणी मुलांचा शोध घेतल्यानंतर, अखेर त्यांना गाडीत बेशुद्धावस्थेत आढळले. कुटुंबातील सदस्यांनी दरवाजे उघडले. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
अजून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.