शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:10 IST

एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले.

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात घडलेली घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. येथे एका नर्सच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाचे बोट चुकून कापले गेले. ही घटना २४ मे रोजी घडली असून, सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

गर्भवती पत्नीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर...मल्लीपलयम गावातील रहिवासी विमलराज यांनी आपल्या गर्भवती पत्नी निवेथाला प्रसूतीसाठी वेल्लोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. काही तासांनंतर या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, बाळाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असल्याने डॉक्टरांनी त्याला तातडीने ग्लुकोज देण्याचा निर्णय घेतला.

नर्स फोनवर बोलत असताना कापले गेले बोटग्लुकोजची सुई पुन्हा बसवताना, संबंधित नर्सने चुकून टेप कापण्याच्या प्रयत्नात कात्रीने बाळाचे बोटच कापले. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, या वेळी नर्स मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होती आणि त्यामुळेच ही गंभीर चूक घडली. बाळाच्या वडिलांनी सांगितले की, या घटनेनंतर दीड तास त्यांना त्यांच्या बाळाला पाहण्याचीही परवानगी मिळाली नव्हती.

प्रशासनात खळबळ; चेन्नईत उपचार सुरूया घटनेनंतर वेल्लोरमधील रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे. जखमी नवजात बाळाला तातडीने चेन्नई येथील स्टॅनली रुग्णालयात हलवण्यात आले असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेशवेल्लोरच्या जिल्हाधिकारी सुब्बुलक्ष्मी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “जर नर्स फोनवर बोलत असल्याचे सिद्ध झाले, तर तिच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच, या प्रक्रियेसाठी कात्रीची आवश्यकता नव्हती, ती काळजीपूर्वक हातानेही पार पाडता आली असती.”

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTamilnaduतामिळनाडूhospitalहॉस्पिटलnew born babyनवजात अर्भक