Shocking! Terrorists in Nagarota were preparing for an attack like 26/11 | बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी

बापरे! २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होते नगरोटामधील 4 दहशतवादी

ठळक मुद्दे२६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त दहशतवादी मोठा षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू-काश्मीरच्या नगरोटा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, एनएसए अजित डोभाल, परराष्ट्र सचिव व सर्व गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. २६/११ च्या वर्षपूर्ती दिनानिमित्त दहशतवादी मोठा षडयंत्र राबवण्याचा प्रयत्न करीत होते असल्याचा मोठा खुलासा करण्यात आला. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदचे मारले गेलेले ४ दहशतवादी होते. 

गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नगरोटा परिसरात सुरक्षा वाढवली आणि प्रत्येक नाक्यावर गाड्यांची जबरदस्त तपासणी केली गेली. या दरम्यान श्रीनगर जम्मू महामार्गावर सकाळी ४.२० वाजताच्या सुमारास काश्मीरच्या दिशेने जाणारा एक ट्रक जवानांनी ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तपासणीदरम्यान ट्रक चालक उतरून पळाला. 

सुरक्षा बलाने जेव्हा ट्रकची तपासणी केली त्यावेळी त्यात पोत्यात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळाले. जवानांनी त्याचा पाठलाग केला आणि कारवाई केली. शूर जवानांनी तीन तास कारवाई करून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.  याव्यतिरिक्त, दारुगोळा देखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. 3 डझन ग्रेनेड व 6 पिस्तूलही सापडल्या. 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आमच्या सुरक्षा दलांनी पुन्हा एकदा महान शौर्य दाखवले. त्यांच्या सतर्कतेमुळेच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट उधळण्यात यश मिळाले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 4 दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा केला असून  त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. 

Encounter in Nagrota: ३ तास सुरु होता गोळीबार! काळ बनून समोर आले जवान, ११ एके ४७ हातात असून देखील कापत होते दहशतवादी 

 

जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले की, गुप्तचरांच्या माहितीनुसार हे तपासणी अभियान चालविण्यात येत होते. एका ट्रकचा शोध घेतला असता गोळीबार सुरू झाला. ही चकमक २ तास चालली. पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या पथकाने ही कारवाई केली. हे चार दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे म्हणाले की, नियंत्रण रेखा (एलओसी) पार करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत. ते म्हणाले की, हा संदेश पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांना अगदी स्पष्ट आहे की जो कोणी भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडेल त्याचप्रकारे त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि ते परत जाऊ शकणार नाहीत. तांदळाच्या पोत्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध मोहीम राबविल्याबद्दल लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी सुरक्षा दलाचे जोरदार कौतुक केले आणि सांगितले की, सेना, जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलांमध्ये चांगले समन्वय आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Terrorists in Nagarota were preparing for an attack like 26/11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.