कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील बेहाला परिसरात पोलिसांना एका महिलेचा मृतदेह दोन वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बेहाला परिसरात राहणा-या वीमा मजुमदार या महिलेचा मृतदेह गेल्या दोन वर्षापासून फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या महिलेच्याच मुलानेच तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला उघडकीस आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा मुलगा सुब्रत मजुमदार आणि पती गोपाल चंद्र यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, त्या महिलेचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.
पैशासाठी 'त्या'नं जन्मदात्या आईचा मृतदेह दोन वर्षं फ्रीजमध्ये ठेवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:52 IST