धक्कादायक! महाशिवरात्रीआधीच द्वारकेतील प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंग चोरीस   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 21:09 IST2025-02-25T21:08:40+5:302025-02-25T21:09:18+5:30

Gujarat Crime News: महाशिवरात्रीच्या सणाचा उत्साह देशभरात असतानाच गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या एका प्राचीन मंदिरातून शिवलिंग चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Shocking! Shivling was stolen from the ancient Shiva temple in Dwarka before Mahashivratri | धक्कादायक! महाशिवरात्रीआधीच द्वारकेतील प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंग चोरीस   

धक्कादायक! महाशिवरात्रीआधीच द्वारकेतील प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंग चोरीस   

महाशिवरात्रीच्या सणाचा उत्साह देशभरात असतानाच गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या एका प्राचीन मंदिरातून शिवलिंग चोरीस गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना महाशिवरात्रीच्या एक दिवस आधीच घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित तपासाला सुरुवात केली आहे. तसेच शिवलिंगाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. 

चोरीची ही घटना द्वारका जिल्ह्यातील श्री भिडभंजन भवानीश्वर महादेव मंदिरात घडली आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील कल्याणपूर येथे स्थित आहे. येथे हरसिद्धी माताजी मंदिराजवळ आहे.

मंदिराचे पुजारी मंदिरात नित्यपूजेसाठी आले असताना मंदिराचा दरवाज उघडा असल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिरात प्रवेश करून पाहिले असता गर्भगृहातून शिवलिंग गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर पुजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

प्रकरणाचं गांभीर्य विचारात घेऊन पोलिसांनी तपासासाठी अनेक पथकं तैनात केली. स्थानिक क्राइम ब्रँच, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि फॉरेन्सिक एक्स्पर्ट्सना तपास कार्यासाठी  नियुक्त करण्यात आले आहे. तसेच डॉग स्क्वॉडची मदतही घेतली जात आहे.  

Web Title: Shocking! Shivling was stolen from the ancient Shiva temple in Dwarka before Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.