धक्कादायक! गर्ल्स हॉस्टेलमधील बाथरूममध्ये कॅमेऱ्यात प्राइव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड, तेलंगणामध्ये विद्यार्थिनींचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:25 IST2025-01-02T18:25:15+5:302025-01-02T18:25:47+5:30
तेलंगणामधये गर्ल्स हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये कॅमेरे लावल्याचे प्रकरण समोर आले आहे.

धक्कादायक! गर्ल्स हॉस्टेलमधील बाथरूममध्ये कॅमेऱ्यात प्राइव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड, तेलंगणामध्ये विद्यार्थिनींचे आंदोलन
तेलंगणातील मेडचल येथील सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील मुलींच्या वसतिगृहातील बाथरूममधील कॅमेऱ्यातून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याच्या आरोपानंतर तणाव वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३०० खासगी व्हिडीओ बनवल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
विद्यार्थिनींचा आरोप आहे की, वसतिगृहातील स्वयंपाक कर्मचाऱ्यांनी वॉशरूममध्ये कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे गुप्तपणे व्हिडीओ रेकॉर्ड केले. यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी निदर्शने करत 'वुई वॉन्ट जस्टिस'च्या घोषणा दिल्या.
पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग, खलिस्तानी अमृतपाल सिंह नवा पक्ष स्थापन करणार
याप्रकरणी कारवाई करण्याबाबत बोलताना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला जाईल, असे सांगितले. सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक जंगा रेड्डी यांनी मुलींच्या वसतिगृहातील टॉयलेटमधील कथित कॅमेऱ्यांबाबत सांगितले की, आम्हाला काल विद्यार्थिनींकडून तक्रार मिळाली होती की, टॉयलेटच्या खिडकीतून कोणीतरी व्हिडीओ बनवला आहे. आम्ही तातडीने पोलिसांना कळवले आणि आम्हीही घटनास्थळी पोहोचलो. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशीही करत आहोत. यामागे जो कोणी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीनिवास रेड्डी यांनी दिलेली माहिती अशी, तक्रारीच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यात वसतिगृहातील पाच कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. आम्ही टॉयलेटच्या खिडकीवर सापडलेल्या बोटांच्या ठशांची पडताळणी करत आहोत. ते म्हणाले, “आम्ही पाच संशयितांचे फोन आधीच तपासले आहेत, परंतु कोणताही व्हिडीओ आढळला नाही. कोणताही व्हिडीओ हटविला गेला आहे की नाही हे तपासण्यासाठी फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला आहे.”
या प्रकरणाबाबत बोलताना एका पालकाने सांगितले की, काल रात्री आमच्या मुलीने आम्हाला बोलावले असता ती रडत होती. त्यांनी आम्हाला व्हिडिओंबद्दल सांगितले. आम्ही आमच्या मुलींच्या सुरक्षिततेची मागणी करतो. आपल्या मुलांचे काही चुकीचे घडताना आपण पाहू शकत नाही. आम्ही व्यवस्थापनाशी बोलण्यासाठी येथे आलो आहोत.