धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:08 IST2023-10-02T13:06:32+5:302023-10-02T13:08:43+5:30

Crime News: हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथील बरोटीवाला येथे असलेल्या अटल कुंज कालुझंडा स्थित चितकारा विद्यापीठातील विद्यार्थिनीसोबत छेडछाड आणि अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Shocking! Porn videos of female students made by female professors, private parts | धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे  

धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे  

विद्यापीठातील महिला प्राध्यापिकाच विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ बनवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथील बरोटीवाला येथे असलेल्या अटल कुंज कालुझंडा स्थित चितकारा विद्यापीठातील विद्यार्थिनीसोबत छेडछाड आणि अश्लील व्हिडीओ बनवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत चितकारा विद्यापीठातील महिला प्राध्यापिकेवरच आरोप झाले आहेत. या प्रकऱणी पीडित विद्यार्थिनीने बद्दी येथील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चितकारा विद्यापीठातील फर्स्ट इयरच्या विद्यार्थिनीने महिला प्राध्यापिकेवर हे गंभीर आरोप केले आहेत. ही प्राध्यापिका तिच्यासोबत छेडछाड करायची. तसेच तिने या विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओसुद्धा बनवले. तसेच प्रायव्हेट पार्टशी चाळेही करायची. सदर प्राध्यापिकेने तीन वेळा व्हिडीओ बनवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.

आपल्या तक्रारीत या विद्यार्थिनीने आरोप केला की, आरोपी महिला मला खोलीत एकट्याने बोलवून विवस्त्र करायची. त्यानंतर माझे व्हिडीओ बनवतानाचा माझ्या गुप्तांगांना स्पर्श करायची. या प्राध्यापिकेने या स्थितीत माझे तीन वेळा व्हिडीओ बनवले आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. मात्र पीडितेने आरोप केला की, तिने याबाबतची तक्रार चितकारा विद्यापीठाच्या व्यवस्थापनाकडे केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

बद्दीचे डीएसपी प्रियांक गुप्ता यांनी सांगितले की, बद्दी येथील महिला पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या जबाबावरून चितकारा विद्यापीठातील महिला प्राध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम ३५४, ३२३ आणि कलम ५०६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

Web Title: Shocking! Porn videos of female students made by female professors, private parts