धक्कादायक! माकडाने वडिलांच्या हातून चिमुकलीला हिसकावले, तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 21:22 IST2022-07-17T21:22:11+5:302022-07-17T21:22:41+5:30

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये माकडाने वडिलांच्या हातून 4 महीन्यांच्या चिमुकलीला हिसकावून फेकल्याची घटना घडली आहे.

Shocking! Monkey grabs toddler from father's hand, throws him from third floor, dies on the spot | धक्कादायक! माकडाने वडिलांच्या हातून चिमुकलीला हिसकावले, तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने जागीच मृत्यू

धक्कादायक! माकडाने वडिलांच्या हातून चिमुकलीला हिसकावले, तिसऱ्या मजल्यावरुन फेकल्याने जागीच मृत्यू


Bareilly News:उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डंका येथे माकडांनी एका माणसाच्या हातातून चार महिन्यांचे बाळ हिसकावून घेतले आणि नंतर त्याला बाळाला गच्चीवरुन खाली फेकले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी वडील मुलाला घेऊन गच्चीवर फिरत होते, यावेळी माकडांच्या टोळक्याने हल्ला करून मुलाला हिसकावून घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या शाही पोलीस स्टेशन हद्दीतील डंका येथील रहिवासी निर्देश उपाध्याय आपल्या 4 महिन्यांच्या चिमुकलीला घेऊन गच्चीवर फिरत होते. यावेळी अचानक माकडांच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. माकडांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर निर्देश यांनी आरडाओरड सुरू केली. काही माकडांनी निर्देश यांना घट्ट पकडून ठेवले. 

अखेर आवाज ऐकून घरातील लोक मदतीसाठी गच्चीवर आले, पण तोपर्यंत माकडांनी निर्देशच्या हातून मुलाला हिसकावून घेतले होते. यावेळी माकडांनी कोणाला काही समजायच्या आत मुलाला छतावरून फेकून दिले. तीन मजल्यांच्या छतावरून खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, निर्देशचे कुटुंबीय गच्चीवर पोहोचले असता माकडांच्या कळपाने त्यांच्यावरही हल्ला केला.
 

Web Title: Shocking! Monkey grabs toddler from father's hand, throws him from third floor, dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.