शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

धक्कादायक! गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतच शहिदाच्या मुलीला धक्के मारत दाखवला बाहेरचा रस्ता

By वैभव देसाई | Published: December 01, 2017 8:34 PM

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही एक सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे.

अहमदाबाद- गुजरातमध्ये सध्या जोरदार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायत. काँग्रेस आणि भाजपाकडून जागोजागी सभा घेतल्या जात आहेत. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे.नर्मदा जिल्ह्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सभेला संबोधित करत होते. त्याच वेळी एक मुलगी हातात कागद घेऊन मंचाच्या दिशेनं जात होती. परंतु मंचावर जाण्यापासून तिला सुरक्षारक्षकांनी रोखलं. त्यावेळी तिनं मी शहिदाची मुलगी आहे. मला मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भेटायचं आहे, असं सांगितलं. परंतु महिला पोलिसांनी तिला जमिनीवर पाडून जबरदस्त मारहाण केली आहे. पोलिसांनी तिचं काहीही न ऐकता महिला पोलिसांकरवी तिला धक्के मारत सभेबाहेर हाकलून दिलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं की सोडून दिलं याचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सभेत हा गैरप्रकार झाल्यामुळे सर्वच स्तरातून याचा निषेध केला जातोय. विशेष म्हणजे त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री विजय रुपाणी स्वतः भाषण ठोकत होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी याचा ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केला आहे. देशभक्त रुपाणीजींनी शहिदाच्या मुलीला सभेच्या बाहेर हाकलवून मानवतेला लाजवेल, असं कृत्य केलं आहे. 15 वर्षांपासून त्या शहिदाच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. न्याय मागणा-या या मुलीला आज अपमानही मिळाला,  भाजपावाल्यांनो, जरा लाज बाळगा, राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर शरसंधान साधलं आहे. सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र सरकराचे पूर्ण मंत्रिमंडळ भाजपाने रणांगणात उतरवलं आहे. भाजपाचे दिल्लीतील मुख्यालयही गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाने नेहमीच राज्य निवडणुका या युद्ध पातळीवरून लढविल्या आहेत, असा दावा सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाहांनी केला होता. परंतु इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत गुजरातच्या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचंही जाणकारांचं म्हणणं आहे. 18 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे अनेक नेते डोळे लावून बसले आहेत. भाजपातील वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद, श्यामलाल गुप्ता आणि अन्य दोन बंडखोर विद्यमान खासदार गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. निकाल जर भाजपाच्या विरोधात गेला तर सध्याची राजकीय घडी विस्कटू शकते. 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपाVijay Rupaniविजय रूपाणी