धक्कादायक...जादू दाखविण्य़ाच्या नादात गंगेमध्ये बुडाला जादूगार; साखळीने हात-पाय बांधलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:35 IST2019-06-17T13:32:30+5:302019-06-17T13:35:29+5:30

जादूगार चंचल हा क्रेनच्या मदतीने नदीमध्ये उतरला होता.

Shocking, Magician sinked in Ganga when he was trying to show magic | धक्कादायक...जादू दाखविण्य़ाच्या नादात गंगेमध्ये बुडाला जादूगार; साखळीने हात-पाय बांधलेले

धक्कादायक...जादू दाखविण्य़ाच्या नादात गंगेमध्ये बुडाला जादूगार; साखळीने हात-पाय बांधलेले

कोलकाता : जादू दाखविण्यासाठी गंगेमध्ये उतरलेला जादूगार पाण्यातून बाहेर आलाच नाही. रविवारी लोखंडी पिंजऱ्यात साखळदंडांनी हात-पाय बांधून घेऊन तो नदीमध्ये उतरला होता. यानंतर बऱ्याच वेळ झाला तरीही तो बाहेर न आल्याने दर्शकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंचल लाहिरी (41) असे या जादूगाराचे नाव आहे. 


तहसीलदार सैयद वकार रजा यांनी सांगितले की, जादूगार चंचल हा क्रेनच्या मदतीने नदीमध्ये उतरला होता. तो दर्शकांना दाखवू इच्छित होता की, नदीमध्ये तो त्याचे हात पाय साखळदंडातून सोडवू शकतो. मात्र, तसे झाले नाही. 


चंचलने दोनवेळा ही जादू करून दाखविली होती. पश्चिम बंगालच्या सोनारपूर शहरातील तो रहिवासी आहे. 2013 मध्ये ही जादू दाखवत असताना तो मृत्यूच्या दारातून मागे आला होता. चंचलला पोलिसांनी गंगेमध्ये जादू दाखविण्याची परवानगी दिली होती. तरीही तेथे सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. पोलिस आणि आपत्ती विभागाचे कर्मचारी चंचलचा मृतदेह शोधत आहेत. 

Web Title: Shocking, Magician sinked in Ganga when he was trying to show magic