शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक: जिवंत शेतकरी कागदोपत्री मृत, बँकेतून ऊसाचे बिल मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 10:29 IST

एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो.

शहाजहाँपूर - सरकार दरबारी फक्त कागदच बोलतो, त्यामुळे कागदोपत्री तुम्ही  कसे आहात हेच महत्त्वाचे असते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एका जिवंत शेतकऱ्याला कागदोपत्री मृत घोषित करण्यात आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शाहजहाँपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा बँकेत आपले पैसे आणण्यासाठी गेले तेव्हा ते मृत असल्याचे सांगण्यात आले. बँक प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे पीडित शेतकऱ्याला चांगलाच धक्का बसला आहे. यासंदर्भात वृत्तसंस्था एएनआयने वृत्त दिले असून पीडित शेतकऱ्याशी संवादही साधला आहे. 

एएनयआयला दिलेल्या मुलाखतीत पीडित शेतकरी म्हणाले की, मी ऊसाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेलो होतो. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या वृत्ताने मला धक्काच बसला. कारण, बँकेकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये मला मृत घोषित करण्यात आले होते. याप्रकरणी माध्यमांत वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तिलहर येथील उपजिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात महसूल विभागाचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. त्यानुसार, २०२१ च्या तिलहर बीडीओंनी संबंधित शेतकऱ्याला मृत घोषित केले आहे. 

या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत सचिवाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यानंतर, या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानंतर, पीडित शेतकऱ्याला प्रमाणपत्रही देण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेbankबँकDeathमृत्यू