धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:30 IST2025-12-06T11:23:57+5:302025-12-06T11:30:49+5:30
तब्बल ६.१४ लाख मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून आले नसल्याचा दावा सीईओंच्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
अहमदाराबाद : गुजरातमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणातून (एसआयआर) धक्कादायक माहिती समोर आली. राज्यातील मतदार याद्यांत १७ लाखांपेक्षा जास्त मृतांची नावे कायम असल्याचा दावा मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने (सीईओ) केला आहे.
तब्बल ६.१४ लाख मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून आले नसल्याचा दावा सीईओंच्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे. नोव्हेंबर महिन्यात गुजरातमध्ये पाच कोटींहून अधिक मतदार नोंदणी अर्ज वाटप केल्या गेले.
राज्यातील ३३ जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यांत १०० टक्के अर्ज वाटप केले आहेत. त्यानंतर मतदारांकडून परत मिळालेल्या अर्जांचे डिजिटलायझेशन काम सुरू झाले, सध्या १२ विधानसभा मतदारसंघामध्ये डिजिटलाझेशनचे काम पूर्ण झाले आहे.
तीस लाखांहून अधिक मतदार स्थलांतरित
या राज्यातील ३० लाखांहून अधिक मतदार कायमचे स्थलांतरित झाल्याचे एसआयआरमध्ये स्पष्ट झाले आहे. राज्यात ३.२५ लाखांहून अधिक मतदारांची दुबार नावे आढळून आली आहेत. राज्यात एसआयआरची मोहीम ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
एसआयआरचा आकडा प्रसिद्ध करा : अखिलेश
उत्तर प्रदेशात आतापर्यंत झालेल्या एसआयआरची माहिती उघड करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शुक्रवारी केली. एसआयआरची कामे करणाऱ्या बीएलओंवर जीवघेणा दबाव टाकू नका, असे ते म्हणाले.