शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

धक्कादायक... गुजरातमध्ये कोरोनाबाधिताच्या छातीवर लाथा मारल्या, रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 9:41 PM

गुजराच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून राजकोटच्या सरकारी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यास मारहाण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देगुजराच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून राजकोटच्या सरकारी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यास मारहाण करण्यात येत आहे.

मुंबई - देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने अनलॉक आणि राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनचा नारा देत सर्व व्यवहार पूर्णपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, दुसरीकडे लोकांची वर्दळ वाढल्याने आणि गर्दीमुळे कोरोनाचा पसार होताना दिसत आहे. देशात दिवसाला जवळपास 1 लाखांच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर, राज्यात दिवसाला 20 ते 25 हजारांच्या घरात रुग्णसंख्या पोहोचत आहे. त्यामुळे, रुग्णांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. 

राज्यासह देशातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना बेड मिळेना झालाय, तर कुठे रुग्णांसाठी ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे, सरकारविरुद्ध सर्वसामान्यांच्या मनात तीव्र संताप आहे. डॉक्टरांकडून होणाऱ्या मानहानीच्याही अनेक तक्रारी समोर येत आहेत. गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती, कोरोनाबाधित रुग्णाच्या छातीवर लाथा मारत असल्याचा दावा सातव यांनी केला आहे.  गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून राजकोटच्या सरकारी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यास मारहाण करण्यात येत आहे. या रुग्णाच्या छातीवर लाथांनी मारहाण करण्यात आली, चापटही मारण्यात आली, त्यामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजीव सातव यांनी ट्विट करुन दिलीय. कोरोनाच्या लढाईतील भाजपाचे गुजरात मॉडल, असे म्हणत सातव यांनी गुजरात सरकारला आणि भाजपाला जबाबदार धरले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातMember of parliamentखासदारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल