गुरुग्राममध्ये ऑनलाइन प्रेमाचा धक्कादायक शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:26 IST2025-08-25T06:25:57+5:302025-08-25T06:26:17+5:30
Haryana Crime News: राजधानी दिल्लीलगतच्या गुरुग्राममध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमाचा धक्कादायक शेवट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र नामक २६ वर्षीय तरुणाने लग्नाच्या आठ महिन्यांनंतर पत्नीची हत्या केली.

गुरुग्राममध्ये ऑनलाइन प्रेमाचा धक्कादायक शेवट
गुरुग्राम - राजधानी दिल्लीलगतच्या गुरुग्राममध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर झालेल्या प्रेमाचा धक्कादायक शेवट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. राजेंद्र नामक २६ वर्षीय तरुणाने लग्नाच्या आठ महिन्यांनंतर पत्नीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील राजेंद्रची निशा (३४) नावाच्या तरुणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दोघांनी मागच्या वर्षी १० डिसेंबर रोजी लग्न केले. मात्र, लग्न होऊन काही दिवस लोटल्यानंतर या दोघांमध्ये वाद होऊ लागले. गुरुवारी रात्री या दोघांमध्ये वाद झाल्याने निशाने राजेंद्रवर स्वयंपाक घरातील कडची उचलली. त्यानंतर संतप्त राजेंद्रने निशाच्या डोक्यात लाटण्याने वार केला. डोक्यातून रक्तस्राव होऊ लागल्याने सुरुवातीला राजेंद्रने तिच्या जखमेला स्कार्फ बांधले. मात्र, थोड्यावेळाने त्याच स्कार्फने राजेंद्रने निशाचा गळा आवळल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.