शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

शॉकिंग! पहिल्या पत्नीवर नवरा जास्त प्रेम करायचा, द्वेषभावनेतून चिमुकलीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:52 PM

पोलीस तपासानंतर या मुलीचा मृतदेह जवळीच जंगल परिसरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण केवळ हत्येचे असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, याप्रकरणी तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला येथे 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिमुकलीची सावत्र आई, सावत्र भाऊ आणि इतर 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. मृत चिमुकली 23 ऑगस्टपासून बेपत्ता होती, त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे बारामुलाचे पोलीस अधीक्षक इम्तियाज हुसैन यांनी म्हटले आहे. आपला नवरा पहिल्या पत्नीवर जास्त प्रेम करायचा आणि ती या मुलीवर जास्त प्रेम करायची. त्यामुळे द्वेषभावनेतून सावत्र आईनेच मुलीच्या हत्येचा कट रचला होता.

पोलीस तपासानंतर या मुलीचा मृतदेह जवळीच जंगल परिसरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण केवळ हत्येचे असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, याप्रकरणी तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, याप्रकरणात कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तसेच मृत चिमुकलीच्या सावत्र आईची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार बलात्कार आणि हत्येचा असल्याचे उघड झाले. या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीचे डोळे फोडले असून तिच्या छातीवर अॅसिड फेकले. या प्रकरणी तिच्या सावत्र आईनेच आरोपींना मदत केली. दरम्यान, पोलिसांनी अॅसिड आणण्यात आलेले कॅन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारJammu Kashmirजम्मू-काश्मीरCrime Newsगुन्हेगारी