धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:22 IST2025-12-16T14:22:21+5:302025-12-16T14:22:39+5:30
Telangana Crime News: एका सात वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारांदरम्यान, मृत्यू झाला आहे. या मुलीला तिच्या आईनेच धक्का देऊन खाली पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय
एका सात वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारांदरम्यान, मृत्यू झाला आहे. या मुलीला तिच्या आईनेच धक्का देऊन खाली पाडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शारोनी मेरी असं मृत मुलीचं नाव असून, घटना घडल्यानंतर त्वरित तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला उपचारांसाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र उपचारांदरम्यान, तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मलकाजगिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मुलीचा मृत्यूस संशयास्पद असल्याचे मानत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासामधून या मुलीला जाणीवपूर्वक खाली फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पोलीस सर्व पैलूंची कसून तपासणी करत आहेत.
या घटनेमागील कारणांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे. तसेच हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेला गुन्हा याची शहानिशा करण्यासाठी मुलीच्या आईचीही पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.