धक्कादायक! IGI विमानतळावर महिला प्रवाशाकडे २२ जीवंत काडतुसे सापडली; दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 12:48 IST2023-07-02T12:47:28+5:302023-07-02T12:48:45+5:30
दिल्ली विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! IGI विमानतळावर महिला प्रवाशाकडे २२ जीवंत काडतुसे सापडली; दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली
दिल्ली विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी विमानतळावर एका महिलेकडे २२ जीवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडून २२ जिवंत आणि १ रिकामी काडतुसे जप्त करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. दिल्लीपोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 'आकासा एअरच्या फ्लाइटमधून दिल्लीहून मुंबईला जात असलेल्या यशी सिंग या महिला प्रवाशाला काल दिल्ली IGI विमानतळावर २२ जिवंत आणि १ रिकाम्या काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले.'
'महिलेकडे वैध कागदपत्रे नव्हती. याप्रकरणी आयजीआय विमानतळ पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम-२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.