शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

'आता मी मुक्त आहे', राजीनाम्यानंतर शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 2:42 PM

शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे.

ठळक मुद्देआता मी मुक्त झालोय - शिवराज सिंह चौहानपराभवाची जबाबदारी पूर्णतः माझीच - शिवराज सिंह चौहान

भोपाळ - शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी अखेर स्वीकारली आहे. स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, ही बाब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

'अब मैं आजाद हूँ', अशी प्रतिक्रिया चौहान यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. ''भाजपा कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. पराभवाची जबाबदारी पूर्णतः माझी आहे'', असेही त्यांनी म्हटलं. 

 'ना हार में, ना जीत में, किंचित नहीं भयभीत मैं, कर्तव्‍य पथ पर जो भी मिले, ये भी सही वह भी सही।', पत्रकारांसोबत बोलताना चौहान यांनी ही कविताही बोलून दाखवली. 

मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परंतु मायावतींनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं मध्य प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करू शकणार आहे. 

दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी दुपारी 12 वाजता काँग्रेसला भेटण्यास बोलावलं होते. यानुसार, काँग्रेस शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसकडून शिष्टमंडळात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा यांचा समावेश आहे.

 

 

 

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानNarendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018