शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'टायगर जिंदा है', शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 5:42 PM

मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजयकी वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहेमुख्यमंत्री निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा हैमध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. मात्र सपा, बसपा आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 121 वर पोहोचले आहे. तर भाजपाकडे 109 आमदार आहेत

भोपाळ -  मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपून नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र राज्यातील राजकीय वर्तुळातील हवा अद्यापही गरमच आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर जिंदा है.''  राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असले तरी काँग्रेस आणि भाजपाच्या संख्याबळामध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. बुधवारी रात्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी अंतिम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी येथून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, ''कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. टायगर  जिंदा है,'' चौहान बोलत असतानाच पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार का? अशी विचारणा मागून झाली. तेव्हा ''कदाचित पाच वर्षेही लागणार नाहीत,''असे प्रत्युत्तर शिवराज सिंह चौहान यांनी दिले. दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी सकाळीसुद्धा एक ट्विट केले. त्यात उंच उडी घेण्यासाठी दोन पावले मागे हटावे लागते, असे या ट्विटमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. सध्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसकडे बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. मात्र सपा, बसपा आणि अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 121 वर पोहोचले आहे. तर भाजपाकडे 109 आमदार आहेत.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस