बापरे! पीक विकून जमा केले 6 लाख; मुलीचं करायचंय लग्न पण बँक म्हणते, "पैसेच नाहीत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:49 IST2023-03-16T13:48:45+5:302023-03-16T13:49:49+5:30
बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये असूनही आपल्या दोन मुलींच्या लग्नाची चिंता आहे. कारण लखपती असूनही बँकेतून पैसे मिळत नसल्याचं म्हटलं आहे.

बापरे! पीक विकून जमा केले 6 लाख; मुलीचं करायचंय लग्न पण बँक म्हणते, "पैसेच नाहीत..."
मध्य प्रदेशच्या शिवपुरीतील महेशपूर येथील एका व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये लाखो रुपये असूनही आपल्या दोन मुलींच्या लग्नाची चिंता आहे. कारण लखपती असूनही बँकेतून पैसे मिळत नसल्याचं म्हटलं आहे. या व्यक्तीने आपल्या कष्टाची कमाई बँकेत जमा केली होती. महेशपूर गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने याप्रकरणी आता जिल्हाधिकार्यांकडे दाद मागितली आहे.
मी 4 वर्षांपूर्वी आपले पीक विकले होते आणि 6 लाख रुपये सहकारी मध्यवर्ती बँकेत, शिवपुरीमध्ये जमा केले होते. आता मला दोन मुलींची लग्ने करायची आहेत पण बँक जमा केलेली रक्कम देत नाही. बँकेत पैसे नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे असं व्यक्तीने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद धाकड यांचा मुलगा उत्तमसिंग धाकड रा. महेशपूर तहसील शिवपुरी यांनी जिल्हाधिकार्यांना अर्ज दिला आहे.
अर्जामध्ये घरात 8 मुली, 1 मुलगा आणि त्यांची पत्नी आहे. घरात एकूण दहा सदस्य आहेत आणि उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. सुमारे 4 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे पीक विकले होते, त्यातील सुमारे 6 लाख रुपये त्यांनी सहकारी मध्यवर्ती बँकेत जमा केले होते. आता त्याला त्याच्या 2 मुलींची लग्ने करायची आहेत, पण त्याला स्वतःची रक्कम बँकेतून मिळवता येत नाही.
उत्तमसिंग हे जवळपास 6 महिन्यांपासून बँकेत चकरा मारत आहेत, मात्र त्यांना रक्कम दिली जात नाही. बँकेत पैसे नाहीत, असे कर्मचारी सांगतात. येईल तेव्हा मिळेल. यामुळे ते आपल्या मुलींची लग्नेही करू शकत नाही आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहही करू शकत नाही. पैसे न मिळाल्याने मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे उत्तम सांगतात. पैसे मिळाल्यानंतरच ते आपल्या मुलींचे लग्न करू शकतील. त्यामुळे रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"