शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शिवारफेरीचा फार्स नको़़़ फोकस

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

सोलापूर जिल्‘ात यंदाच्या मोसमातील एकही दमदार पाऊस झाला नाही़ गेल्या तीन महिन्यांपासून वरुणराजाने वक्रदृष्टी दाखविल्याने जिल्‘ात सध्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने गारपीट, अवकाळी पावसाने जिल्‘ात थैमान घातले होते़ त्यात सर्वाधिक नुकसान झाले ते शेतकर्‍यांचेच़ गतवर्षीतील रब्बीचे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले़ कडबा काळा पडला़ अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले़ द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या सर्व पिकांच्या व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले खरे, पण महसूल प्रशासनातील तलाठी, कोतवाल यांनी घटनास्थळाला जाऊन स्वत: पाहणी करून पंचनामे करण्याऐवजी कार्यालयात बसूनच उतारे काळे केले़ त्या

सोलापूर जिल्‘ात यंदाच्या मोसमातील एकही दमदार पाऊस झाला नाही़ गेल्या तीन महिन्यांपासून वरुणराजाने वक्रदृष्टी दाखविल्याने जिल्‘ात सध्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने गारपीट, अवकाळी पावसाने जिल्‘ात थैमान घातले होते़ त्यात सर्वाधिक नुकसान झाले ते शेतकर्‍यांचेच़ गतवर्षीतील रब्बीचे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले़ कडबा काळा पडला़ अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले़ द्राक्ष, डाळिंब, आंबा आदी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ या सर्व पिकांच्या व फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले खरे, पण महसूल प्रशासनातील तलाठी, कोतवाल यांनी घटनास्थळाला जाऊन स्वत: पाहणी करून पंचनामे करण्याऐवजी कार्यालयात बसूनच उतारे काळे केले़ त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने नुकसानभरपाई देण्यात आली़ मात्र यात खरोखर ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले, ते वंचितच राहिले़ कारण ज्या शेतकर्‍यांनी मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यांचे खिशे भरले त्यांचीच नावे यादीत पाठविली गेली़ खर्‍या लाभार्थ्यांना नुकसानभरपाई मिळालीच नाही़ या लाभार्थ्यांनी नुकसानभरपाई मिळावी म्हणून नंतर मोर्चे काढले, निवेदने दिली, परंतु त्याकडे दुर्लक्षच झाले़ प्रशासनाने तुम्ही बँकेचा खाते क्रमांक दिला नसल्याचे कारण पुढे केले आणि हा शेतकर्‍यांचा निधी माघारी पाठविला़ सर्व जण झाले गेले विसरून गेले़ आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता बँकेकडे हात पसरवत कर्ज काढून नव्या जोमाने खरीप पिकाच्या तयारीला लागला़ उन्हाळी मशागत केली़ खरिपाच्या पेरणीसाठी खते, बी-बियाणांची खरेदी केली़ जून महिना उजाडला तो नैराश्येनेच़ पाऊस काही पडेना! शेतकरी पावसाची वाट पाहत ढगाकडे बघत बसला़ जूनअखेरला रिमझिम पाऊस झाला़ पुढील नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, या अपेक्षेने खरिपाची पेरणी केली़ परंतु पावसाने दगा दिला़ पेरलेले धान्य उगवलेच नाही़ शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला़ पाऊस पडत नसल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होऊ लागला़ गारपिटीत काळा पडलेला कडबाही संपुष्टात आला़ आता काय करावे, या चिंचेत शेतकरी आहे़ या चिंताग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही़ आता जिल्हाधिकार्‍यांनी शिवारफेरी करण्याचे आदेश महसूल कर्मचार्‍यांना दिले आहेत़ महसूल कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाण्याऐवजी रोडवरच उभे राहून पाहणी करून निघून जातात़ खरिपाची पेरणी केली मात्र पावसाअभावी उगवले नाही, असे शेतकरी सांगताच तुम्ही खोटे बोलता उगवलेले रोपतरी दाखवा, असे सांगून नोंद करण्यास हे कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत़ त्यामुळे कलेक्टरसाहेबांना इतकेच सांगणे आहे की, आता शेतकर्‍यांची कुचेष्टा करीत शिवारफेरीचा फार्स करायला नको!
- प्रभू पुजारी