'युतीचा धर्म' शिकवणाऱ्या मोदींना शिवसेनेचा 'प्रेमाचा सल्ला'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 13:46 IST2019-01-02T13:45:32+5:302019-01-02T13:46:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखित केले.

'युतीचा धर्म' शिकवणाऱ्या मोदींना शिवसेनेचा 'प्रेमाचा सल्ला'
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून प्रादेशिक पक्षांचे महत्त्व अधोरेखित केले होते. विशेष म्हणजे, अप्रत्यक्षपणे आपल्या टीका करणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोदींनी युतीचा धर्म शिकवला होता. मात्र, मोदींच्या या शिकवणीवरुन आता शिवसेनेने भाजपाला प्रेमाचा सल्ला दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचं दिल्लीत एक अन् गल्लीत वेगळंच असतं, अस राऊत यांनी म्हटलंय.
एनडीएमध्ये प्रादेशिक पक्षांना महत्त्व दिलं जात, त्यामुळे आमच्या कार्यकाळात प्रादेशिक पक्षांचा विस्तार झाला असून काँग्रेसजवळील प्रादेशिक पक्ष कोमजले होते, असे मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींसह भाजपाला प्रेमाचा सल्ला दिलाय.
राऊत यांचे मुद्दे :
एनडीए ही भाजपाच्या मालकीची संघटना नाही
प्रादेशिक अस्मिता राहणारच
शिवसेनेसारखे पक्ष तुम्हाला जुमानणार नाही
महाराष्ट्रात शिवसेना आहे आणि राहील
आम्ही या सगळ्या विषयाकडे फार गांभीर्याने बघत नाही
दिल्लीत एक गल्लीत एक भूमिका घेणं योग्य नाही
2019 आधी अध्यादेश काढून राम मंदिर उभारावं
बहुमताचं सरकार येऊनही राम वनवासातच
मुलाखतीबद्दल काय वाटतं? या प्रश्नावर राऊत म्हणाले...
अनेक वर्ष मीही पत्रकारितेत आहे.
काळ्याचे पांढरे झाले पत्रकारितेत
आम्हाला सगळं माहीत आहे काय असतं ते